गावागावांत विकासकामांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांत विकासकामांवर भर
गावागावांत विकासकामांवर भर

गावागावांत विकासकामांवर भर

sakal_logo
By

swt292.jpg
05657
बिबवणेः रस्त्याचे भूमिपूजन करताना सरपंच सृष्टी कुडपकर. बाजूला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संजय पडते, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, दीपक सावंत, प्रसाद निर्गुण आदी.

गावागावांत विकासकामांवर भर
विनायक राऊत यांची ग्वाही; बिबवणेत रस्ता कामांचे उद्घाटन, भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. 29 ः ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासकामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत. यापुढील काळात देखील गावागावांत विकासकामांसाठी भरीव निधी देण्यावर आमचे प्रयत्न राहतील. बिबवणे गावात यापूर्वी विकासकामे झाली असून येत्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी बिबवणेवासीयांना दिली.
खासदार राऊत व आमदार नाईक यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेल्या बिबवणे येथील दोन रस्त्यांचे उद्घाटन व भूमिपूजन राऊत व नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बिबवणे येथील मंगेश बिर्जे घर ते मांगलेवाडी रस्त्यासाठी खासदार राऊत यांनी खासदार फंडातून नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या रस्त्याचे भूमिपूजन सरपंच सृष्टी कुडपकर यांच्या हस्ते झाले. तर बिबवणे कुपीतर ते गावडे-ओरोसकर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी आमदार नाईक यांनी आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन बिबवणे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम ओरोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवा नेते छोटू पारकर, सरपंच कुडपकर, माजी सरपंच सायली मांजरेकर, उपसरपंच दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्तप्रसाद खानोलकर, सप्रेम बिबवणेकर, सदस्या आर्या मार्गी व दिव्या हळदणकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम ओरोसकर, माजी सरपंच कृष्णा बिबवणेकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर लुडबे, माजी पोलिस पाटील आबा राऊळ, बिबवणे शिक्षण संस्थेचे संचालक निखिल ओरोसकर, माजी उपसरपंच योगेश राऊळ, शाखाप्रमुख प्रसाद निर्गुण, पोलिस पाटील शैलेश राऊळ, ग्रामपंचायत माजी सदस्य उत्तम कोंडूरकर, राजन मांजरेकर, दादा नाईक व आनंद मार्गी, वसंत बिबवणेकर, प्रदीप ओरोसकर, विलास बिबवणेकर, दशरथ नाईक, प्रकाश नाईक, मंगेश बिर्जे, अशोक बिबवणेकर, विजय सावंत, श्रीकांत शेट्ये, अनिल सावंत, चंद्रकांत तुळसकर, संतोष बिर्जे, अनिल मांजरेकर, महेश अडसुळे, अक्षय सावंत, नीलेश वेंगुर्लेकर, मुकुंद नाईक, बाळू नाईक, समीर बिर्जे, संदेश नाईक, शशांक नाईक, आशिष गावडे, मेघा नागवेकर, गौरव नागवेकर, अभी कुडपकर, अमर नाईक यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी बिबवणेत यापुढेही विकासकामे पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. तर आमदार नाईक यांनी बिबवणे महामार्ग ते मांगलेवाडी या साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन कोटी 89 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार राऊत, आमदार नाईक, जिल्हाप्रमुख पडते व बबन बोभाटे यांचा ग्रामपंचायत तसेच शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

चौकट
खासदार राऊतांना ग्रामस्थांचे निवेदन
कर्ली नदीपात्राचा भाग खचत असून तेथील सार्वजनिक स्मशानभूमीला धोका निर्माण झाला आहे. तेथे संरक्षक भिंतीसाठी निधी मिळावा. स्मशानभूमी शेड, कुलकर्णींवाडी, श्री गिरोबा मंदिर, पळसेवाडी या रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणासठी निधी मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच कुडपकर यांनी खासदार राऊत यांना सादर केले.