राजापूर-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-संक्षिप्त पट्टा
राजापूर-संक्षिप्त पट्टा

राजापूर-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By


फोटो ओळी
-rat30p25.jpg ः KOP23M05899 राजापूर ः राजापूर अर्बन बँकेच्यावतीने सिद्धि मोहिते हिचा सन्मान करताना अध्यक्ष हनिफ मुसा काझी.


बारावीतील गुणवंत सिद्धी मोहितेचा
राजापूर अर्बनतर्फे सत्कार
राजापूर ः शहरातील नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी सायन्समध्ये 83.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सिद्धी मोहिते हिचा मंगळवारी राजापूर अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या हस्ते बँकेच्या प्रधान कार्यालयात हा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर, संचालक राजेंद्र कुशे, संजय ओगले, ॲड. शशिकांत सुतार, किशोर जाधव, विवेक गादीकर, दीनानाथ कोळवणकर आदी उपस्थित होते.


पन्हाळजे बसफेरी पूर्ववत
खेड ः येथील बसस्थानकातून दुपारी 1.45 वा. सुटणारी बसफेरी अनेक महिन्यांपासून बंद होती. बहिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्या पाठपुराव्यानंतर रविवारपासून बसफेरी पूर्ववत झाली आहे. खेड-पन्हाळजे बसफेरी बंद असल्याने खाडीपट्ट्यातील विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत होते. ती पूर्ववत करण्यासाठी निवेदनेदेखील देण्यात आली होती; मात्र तरीदेखील बसफेरी सुरू न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत चौगुले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्रव्यवहार केला. यानंतर बसफेरी तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश जिल्हा विभाग नियंत्रकांना देण्यात आले. त्यानुसार आगारास सूचना देण्यात आल्या. त्यानुसार बस सुरू करण्यात आली आहे.

फोटो ओळी
-rat30p29.jpg ःKOP23M05907 साडवली ः देवरूख येथे ''सकाळ'' बातमीदार प्रमोद हर्डीकर यांना जनसेवक पुरस्काराने सन्मानित करताना आमदार कपिल पाटील.

प्रमोद हर्डीकर यांना जनसेवक पुरस्कार
साडवली ः जनता दल युनायटेडतर्फे देवरूख येथील संवाद मेळाव्यात आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते ''सकाळ''चे बातमीदार प्रमोद हर्डीकर यांना जनसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सुरेश भायजे, राजन देसाई, भाऊ कांगणे, युयुत्सु आर्ते, बबन बांडागळे, दीपक लिंगायत आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्‍या संस्था, संघटना व व्यक्तींना जनसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये कुणबी समाजाचे विलास गोंधळी, विधवा-परितक्त्या महिलांसाठी काम करणाऱ्या वैदेही सावंत, दिव्यांगांचे नेते राकेश कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक उस्मान साटविलकर, तळवडे-ओझरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्रवीण टक्के, क्रांती व्यापारी संघटना, राजू काकडे हेल्प अॅकॅडमी, समाजसेवक प्रशांत विंचू, समाजसेवक केतन दुधाणे, सेवानिवृत्त शिक्षक राजाराम कदम, समाजसेवक इम्रान जेठी, समाजसेविका अंजली यादव, देवरूख पंचायत समितीचे माजी सभापती नारायण भुरवणे, तायक्वांदो प्रशिक्षक शशांक घडशी, निवे बु. चे उपसरपंच अमोल जाधव यांना जनसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.