
‘व्ही. जी. फिटनेस’तर्फे वेंगुर्लेत क्रीडा महोत्सव
०५८९५
वेंगुर्ले ः व्ही. जी. फिटनेसतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
‘व्ही. जी. फिटनेस’तर्फे
वेंगुर्लेत क्रीडा महोत्सव
वेंगुर्ले ः येथील कॅम्प मैदानावर व्ही. जी. फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. महोत्सवात अडथळा शर्यत व १०० किलोमीटर धावणे या स्पर्धांमध्ये वीरा तारी, रेयांष पाटील, पुनित माने, मयुरी परब, काना परब, ईशान वडियार, ईशा कुबल, ओम पडते, गार्गी पेडणेकर, वेदश्री रेडकर, शुभ्रा नागवेकर, आर्या सरमळकर, अंजली करंगुटकर, सारा बागवे, शौर्य मांजरेकर, देवेन वडियार, सर्वेश परब, भाग्येश रांजणकर, चिन्मय कुडपकर, आराध्य प्रभुसाळगावकर यांनी यश पटकाविले. पालकांनीही या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगेश नाईक, उमेश पाटील, श्रीकांत गावडे, प्रसाद परब, अनिकेत ताम्हणकर, योगेश राऊळ, सुरेंद्र चव्हाण, सुभाष तोडकर, सूर्यकांत कावले, जयराम वायंगणकर, विकास सावळ, सोनाली चेंदवणकर, रुपाली दाभोलकर, स्वाती गावडे, सानिका सरमळकर आदींनी सहकार्य केले. बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी सर्व पालक, विद्यार्थी व व्ही. जी. फिटनेसचे संचालक वासुदेव गावडे उपस्थित होते. प्रतिराज कुडपकर यांनी आभार मानले.
--
सावंतवाडीत उद्या ज्येष्ठांची सभा
सावंतवाडी ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा ३ जून ऐवजी ४ ला ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र सालईवाडा येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासद बंधूभगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.