देवरूख-कुडवली मार्गावरील मोरीवर पडला भलामोठा खड्डा

देवरूख-कुडवली मार्गावरील मोरीवर पडला भलामोठा खड्डा

फोटो ओळी
-rat३१p१९.jpg-OP२३M०६१५९ देवरूख ः पाटगाव-पूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करताना ग्रामस्थ.

पाटगाव ते पूरगाव दरम्यान मोरीवर पडला खड्डा

रस्ता बंद पडण्याची भीती ; आवश्यक भराव टाकला नसल्याचा अंदाज
संगमेश्वर, ता. १ ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-कुडवली मार्गावर पाटगाव ते पूरगावच्या सीमेदरम्यान एका मोरीवर भलामोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पावसाळ्यात मोठा होत गेला तर वाहतूक बंद पडण्याची भिती स्थानिकांमध्ये आहे. या मोरीखाली आवश्यक तेवढा भराव टाकण्यात आलेला नसल्यामुळे खड्डा पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
देवरूखसह पाटगाव, पूर, कुडवली, धामापूर आदी गावांना हा रस्ता जोडलेला आहे. शाळेत जाणारी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण, नोकरीसाठी ये-जा करणारे कामगार, नोकरवर्ग हा मार्ग कमी अंतराचा म्हणून याचा उपयोग करतात; मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी डागडुजी झालेली नाही. या मार्गावर पाटगाव ते पूरगावच्या सीमेदरम्यान असलेल्या मोरीवर मोठा खड्डा पडलेला आहे. या मोरीखाली भरावात पाहीजे तेवढी माती टाकली नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद झाला तर येथील ग्रामस्थांची अनेक बाबतीत गैरसोय होईल. या मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे कोणताही अनर्थ वा अपघात घडू नये यासाठी कुडवली येथील मिलिंद जाधव, उपसरपंच अमित जाधव, सुषमा जाधव, मनस्वी जाधव व पूर येथील सीताराम झेपले यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन या खड्ड्याच्या बाजूने दगड लावून ठेवले आहेत. या खड्ड्यांमुळे येथील सुरू असलेली बसफेरी बंद पडली आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे बसफेरीअभावी स्थानिक प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होईल.

चौकट
मार्गाची स्थिती जैसे थे
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत १५ ऑगस्ट २०२२ ला उपोषणाचीही भूमिका घेतली होती. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न सुटावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती; मात्र पाऊस तोंडावर आला तरी या मार्गाची स्थिती जैसे थे च आहे. या मार्गावरील खचलेल्या एका मोरीमुळे प्रवाशांसह ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे.

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com