तृप्ती टेमकर हिचा परुळे येथे सत्कार

तृप्ती टेमकर हिचा परुळे येथे सत्कार

तृप्ती टेमकर हिचा
परुळे येथे सत्कार
वेंगुर्ले, ता. १ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र वित्त व लेखा वर्ग १ सहायक संचालकपदी निवड झालेल्या परुळे कर्ली गावची कन्या तृप्ती टेमकर हिचा परुळे बाजार ग्रामपंचायतीतर्फे काल (ता. ३१) नागरी सत्कार करण्यात आला. सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, विस्तार अधिकारी शिंगाडे, श्री. नानचे, सदस्य प्रदीप प्रभू, महिला बाल कल्याण विभागाच्या पर्यवेक्षक शर्मिष्ठा सामंत, सदस्य सुनाद राऊळ, अभय परुळेकर, पुनम परुळेकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर, कृष्णा टेमकर, ग्रामसेवक शरद शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागात राहूनही आपली जिद्द असेल तर स्पर्धा परीक्षा पास होता येतात. यासाठी संयम व अभ्यास याची गरज असल्याचे तृप्ती टेमकर यांनी सांगितले
..............
पाणी जपून वापरण्याचे
वेंगुर्ले पालिकेचे आवाहन
वेंगुर्ले, ता. १ ः शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने ३० मेपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील अस्तित्वातील पाण्याचा साठा, पाण्याची वाढती मागणी याचा विचार करता तसेच तलावातील पाणी साठ्याचा अंदाज घेता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा लांबल्यास त्याप्रमाणे पुढील नियोजन राहील, अशी माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com