युवा रक्तदाता संघटनेच्या 10 रक्तदात्यांचे रक्तदान

युवा रक्तदाता संघटनेच्या 10 रक्तदात्यांचे रक्तदान

युवा रक्तदाता संघटनेच्या
१० रक्तदात्यांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः येथील युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीसह गोवा-बांबुळी येथील रुग्णांना रक्तदान करत जीवनदान देण्यात आले. तब्बल १० रक्तदात्यांनी युवा रक्तदाता संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढाकार घेतला. यासाठी दात्यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व रुग्णांच्या नातेवाईकांकडून आभार मानण्यात आले.
यामध्ये गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या दादा वर्दम या रुग्णाला ऑपरेशन दरम्यान ''ओ पॉझिटिव्ह'' या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. सावंतवाडी येथून अमिर खान, अक्षय मठकर यांनी गोवा-बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट असलेल्या एका रुग्णाला ''बी पॉझिटिव्ह'' या रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती. अखिलेश कानसे, वर्धन पोकळे, सूरज सावंत, तुषार विचारे, मिनिनो रॉड्रिग्ज यांनी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. येथील यशराज रुग्णालयात डिमेलो या रुग्णाला ओ पॉझिटिव्ह या रक्तगटासाठी रोहित राऊळ यांनी रक्तदान केले. भक्ती रुग्णालयामध्ये सावित्री कोळेकर या रुग्णाला ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटासाठी जलाल‌ खान, राहुल पई यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com