वाफोलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाफोलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
वाफोलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वाफोलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

swt17.jpg
06308
वाफोलीः येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर.

वाफोलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ग्रामपंचायतीचा उपक्रमः अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुपारीचे रोप व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला.
उपसरपंच विनेश गवस यांच्या हस्ते स्नेहलता वारंग व सरपंच उमेश शिरोडकर यांनी मीनाक्षी सामंत यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान केला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी जतिन देसाई, वैष्णवी देसाई, कनिष्का गवस, आकांक्षा गवस, साक्षी गवस, स्नेहा गवस, विनायक नाईक, यश गवस, सिद्धेश भोगटे, धनश्री खडपे, प्रज्योत गवस, राणी कांबळे, मंदार गवस, साहिल कळंगुटकर, अभी कोरगावकर, दत्तप्रसाद ठाकूर, दीक्षा गवस यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उमेश शिरोडकर, उद्घाटक दत्ताराम वारंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित महाले, प्रा. उमेश परब, प्रा. रमाकांत गावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थांना डॉ. महाले, प्रा. परब, प्रा. गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्नेहलता वारंग यांनीही आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. आजचा अभ्यास आजच करा, तो उद्याला ठेऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी केले. तर उपसरपंच गवस यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी व्हाईस चेअरमन अनिल गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, मंजुळा शेगडे, स्नेहा आईर, अमित कळंगुटकर, डाटा ऑपरेटर वैभवी देसाई, आशा सेविका ऋतुजा गवस, ज्योती सावंत, अंगणवाडी सेविका तृप्ती परब, सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी, लवू कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.