पडवे-माजगाव-कुडासे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी आंदोलन

पडवे-माजगाव-कुडासे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी आंदोलन

पडवे-माजगाव-कुडासे रस्त्याच्या
दुरुस्तीसाठी मंगळवारी आंदोलन
रामचंद्र सावंतः दुरुस्तीअभावी मार्ग धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. १ः पडवे-माजगाव तळकट-कुंब्रल-कुडासेपर्यतच्या रस्त्याची डागडुजी त्वरीत न केल्यास येत्या मंगळवारी (ता.6) जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सावंतवाडी येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतर्फे तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी दिला आहे.
पडवे-माजगाव तळकट-कुंब्रल-कुडासेपर्यतच्या रस्त्यावरील तळकट सोसायटी ते तळकट तिठा हा भाग वगळून इतर सर्व मार्ग जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत येतो. या रस्त्याची गेली दोन वर्षे मागणी होऊनही दुरुस्ती झालेली नाही. प्रत्येकवेळी हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडकमधून होणार असल्याचे सांगण्यात येते. बांधकाम विभाग पंतप्रधान ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवते; मात्र उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान ग्रामसडकमधून या रस्त्याची दोनदा निविदा प्रसिध्द झाली; मात्र ती कोणीच न भरल्यामुळे हे काम पावसाआधी होण्याची शक्यता धुसर आहे. पुर्नबांधणी होणार असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग सुशेगात राहिला. दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव सादर केला नाही; मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुरुस्तीसाठी काही रकमेची तरतूद करण्यात आली. ही रक्कम कमी असल्याने फार कमी भागाची दुरुस्ती होऊ शकणार आहे. पाऊस तोंडावर आला तरी ते कामही सुरु झालेले नाही. सध्या या मार्गावरुन गाडी चालवणे कठिण बनले आहे. पूर्ण रस्ता उखडला आहे.
या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील विविध पक्षांचे लोकप्रतिनीधी व ग्रामस्थांनी दोडामार्ग येथे बांधकामचे शाखा अभियंता अमित कल्याणकर आणि गटविकास अधिकारी पाटकर यांची भेट घेतली. त्यांच्याकडे दुरुस्तीची मागणी करण्यात आली. यावेळी श्री. सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, विलास सावंत, विजय भिसे, संदीप कळमकर आदी उपस्थित होते.
अजूनही दुरुस्तीच्या दृष्टीने काहीच हालचाली नसल्याने येत्या मंगळवारी बांधकामच्या सावंतवाडी येथील विभागिय कार्यालयासमोर आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना घेरोओ घालण्याचा इशारा श्री. सावंत यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com