''गाळमुक्त धरण'' योजनेंतर्गत विलवडेत गाळ उपशास प्रारंभ

''गाळमुक्त धरण'' योजनेंतर्गत विलवडेत गाळ उपशास प्रारंभ

swt120.jpg
M06360
विलवडेः गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

''गाळमुक्त धरण'' योजनेंतर्गत
विलवडेत गाळ उपशास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रथमच जिल्ह्यातील विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आज सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी रामचंद्र धोत्रे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, भूमिअभिलेख कार्यालय निरीक्षक विनायक ठाकरे, जलसंधारण अधिकारी तुषार यादव, सौरभ आहिरे, मंडळ अधिकारी मालवणकर, अशासकीय संस्था म्हणून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, बाळकृष्ण शेळके, हनुमंत गवस, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मुकुंद परब, तलाठी अक्षवी भिंगारे, पोलिस पाटील पांडुरंग कांबळे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी शासनाच्यावतीने अनुदान देणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शिवारामध्ये घेऊन जाण्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com