राजापूर-सेल्फी काढताना डोहात पडून तरूण बुडाला

राजापूर-सेल्फी काढताना डोहात पडून तरूण बुडाला

सेल्फी काढताना डोहात पडून तरुण बुडाला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ : तालुक्यातील सौंदळ नजीकच्या ओझरकोंड धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरल्याने निखिल मंगेश मोहिते (वय १८, रा. सौंदळ भालेकरवाडी) हा तरूण खोल डोहात बुडाला. ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी उशिरा घडली. बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू असून गुरुवारी (ता. १) सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सौंदळ येथील निखिल मंगेश मोहिते आणि त्याचे काही सहकारी मित्र हे परिसर पाहण्यासाठी ३१ मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. फिरत फिरत ते सौंदळ नजीकच्या ओझर कोंड येथील धबधब्यावर आले. या ठिकाणी निखिन मोहिते याला उंचावरुन सेल्फी काढण्याची इच्छा झाली. सेल्फी काढीत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि सुमारे तीस फूट खाली खोल धबधब्याच्या डोहात कोसळला. दरम्यान ही खबर वार्‍यासारखी गावात पसरली आणि गावकर्‍यांनीही धबधब्याच्या दिशेने धाव घेतली. बुडालेल्या निखिलचा शोध घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत बुडालेल्या निखिलचा शोध लागला नव्हता. त्यासाठी स्कूबा डायव्हरना पाचारण करण्यात आले असून तेही शोध घेत असून या ठिकाणी शासकीय यंत्रणेसह पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ धबधबा परिसरात उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com