''गाळमुक्त धरण'' योजनेचा लाभ घ्या

''गाळमुक्त धरण'' योजनेचा लाभ घ्या

swt125.jpg
06389
शिरवलः ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ अभियानाचा प्रारंभ करताना प्रांताधिकारी प्रशांत पनवेकर व अन्य. (छायाचित्रः संदेश देसाई)

''गाळमुक्त धरण'' योजनेचा लाभ घ्या
प्रशांत पानवेकरः शिरवल धरणावर अभियानाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा  
दोडामार्ग, ता. १ : शासनाने अंमलात आणलेले ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ हे अभियान उत्तम आहे. धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतीत घालणे या त्यामागचा उद्देश आहे. जेणेकरून गाळाने भरलेली धरणे गाळमुक्त होतील आणि सुपीक गाळातून शेतीला पोषक खाद्य मिळेल. सुपीक गाळ शेतीत टाकल्याने भरघोस उत्पन्न मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतीत टाकून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केले.
तालुक्यातील शिरवल धरणावार ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या अभियानाचा प्रारंभ आज सायंकाळी प्रांताधिकारी पानवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जलसंधारण विभागाचे उपअभियंता आर. टी. धोत्रे, स्थापत्य अभियंता तुषार यादव, जिल्हा प्रकल्प समन्वयक नितीन सावंत, सरपंच सुजल गवस, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, चंद्रशेखर देसाई, विलास सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीराम गवस आदींसह कुंब्रल, शिरवल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रकल्प समन्वयक सावंत म्हणाले, ‘‘शिरवल धरण सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधले. या धरणात अमाप गाळ साचला आहे. सध्या शासनाच्या सुरू असलेल्या अभियानाचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा उचलून येथील सुपीक गाळ आपल्या शेतात न्यावा. यासाठी शासनाकडून हेक्टरी अनुदानही दिले जाणार आहे. येथे राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य अशा उपक्रमाला ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com