आपत्काळात जनतेची भूमिका महत्त्वाची

आपत्काळात जनतेची भूमिका महत्त्वाची

swt129.jpg
06409
वैभववाडीः उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी करुळ ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सागर खंडागळे, नरेंद्र कोलते आदी उपस्थित होते.

आपत्काळात जनतेची भूमिका महत्त्वाची
विनोद कांबळेः करुळ येथे आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी ता. १ः नैसर्गिक आपत्तीसह अपघात किंवा आणखी कोणत्याही संकटात जनतेची सहकार्याची भूमिका महत्त्वाची असते. जनतेच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे प्रशासनाला आपत्तीवर मात करता येते. त्यामुळे जनतेने असे सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी येथे केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कांबळे यांनी करुळ येथे आढावा घेतला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कोलते, सह्याद्री जीवरक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, पोलिस पाटील प्रताप पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पवार, ग्रामसेवक शशिकांत गुरव व सह्याद्री जीवरक्षक ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, ‘‘वैभववाडी तालुक्यात करुळ व भुईबावडा हे दोन घाट येतात. हे दोन्ही घाट संवेदनशील आहेत. या घाटांमध्ये पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्ती घडत असतात. या काळात जनतेची सहकार्याची भूमिका आवश्यक आहे. जनतेने अशा संकटांत पोलिसांना सहकार्य केल्यास प्रशासन या आपत्तींवर मात करू शकेल. मागील काही वर्षांत येथील सह्याद्री जीवरक्षक व ग्रामरक्षक दलाने सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले काम पोलिस प्रशासन कधीही विसरणार नाही. प्रशासनाकडून ग्रामरक्षक दलाला आवश्यक तो साहित्य पुरवठा नक्कीच केला जाईल.’’
खंडागळे म्हणाले, ‘‘आपत्तीच्या काळात ग्रामरक्षक दल व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय असला पाहिजे. करुळ ग्रामरक्षक दलाने आपत्तीच्या काळात दिलेले योगदान हे न विसरण्यासारखे आहे. या दलाच्या पाठीशी पोलिस प्रशासन नेहमीच राहील.’’
सरपंच नरेंद्र कोलते, हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वैभववाडी पोलिस ठाण्याकडून ग्रामरक्षक दलाला बॅटरी भेट देण्यात आली. करुळ ग्रामपंचायत व सह्याद्री जीवरक्षक यांच्यावतीने कांबळे, खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. आभार शशिकांत गुरव यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com