चिपळूण आगाराला ५९ लाख ८१ हजाराचा नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण आगाराला ५९ लाख ८१ हजाराचा नफा
चिपळूण आगाराला ५९ लाख ८१ हजाराचा नफा

चिपळूण आगाराला ५९ लाख ८१ हजाराचा नफा

sakal_logo
By

चिपळूण आगाराला ५९ लाख ८१ हजाराचा नफा
चिपळूण, ता. २ : उन्हाळी हंगामात चिपळूण आगाराला तब्बल ५९ लाख ८१ हजार ९८८ रुपये इतके उत्पन्न मिळाले. मे महिन्यासाठी बहुसंख्य चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले होते. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी आगमनासह परतीसाठी येथील आगारातून जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या.
मे महिना सुट्टी व लग्नसराईचा हंगाम असल्याने यानिमित्ताने बहुसंख्य चाकरमानी आपल्या गावी येत असतात. त्यांच्या सेवेसाठी चिपळूण आगार प्रशासनाने महिनाभरापूर्वीच तयारी सुरू केली होती. खऱ्याअर्थाने एप्रिल महिन्याच्या अखेरपासून चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले होते. संपूर्ण मे महिन्यात चाकरमान्याची ये-जा सुरुच होती. त्यांची प्रवासादरम्यान गैरसोय होवू नये यासाठी ठाणे, भांडूप, बोरिवली, सातारा, मुंबई, पनवेल, स्वारगेट, चिंचवड, कोल्हापूर अशा जादा फेऱ्या सुरू केल्या होत्या. या बसेसना उत्तम प्रतिसाद मिळाला. असे असतानाच वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्याने तब्बल तासभर उशिराने ग्रामीण फेऱ्या धावत होत्या. मे अखेरीस परतीच्या प्रवासासाठी चाकरमानी निघाल्याने यावेळी आगारात प्रवासी भारमान सर्वाधिक वाढले होते. अखेर याचा निश्चितपणे फायदा आगाराला झाला.