बांदा ‘खेमराज’मध्ये निशांत नाईक प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा ‘खेमराज’मध्ये निशांत नाईक प्रथम
बांदा ‘खेमराज’मध्ये निशांत नाईक प्रथम

बांदा ‘खेमराज’मध्ये निशांत नाईक प्रथम

sakal_logo
By

06549
निशांत नाईक, कौस्तुभ सावंत, ईशिता सावळ

बांदा ‘खेमराज’मध्ये निशांत नाईक प्रथम
बांदा ः धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून परीक्षेसाठी एकूण ८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्राविण्य विद्यार्थी ५०, प्रथम श्रेणी १७, द्वितीय श्रेणीमध्ये १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निशांत नाईक (९६.८०), कौस्तुभ सावंत (९४.६०), ईशिता सावळ (९४.२०) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. संस्थाध्यक्षा सीमा तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिंलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, खजिनदार वैभव नाईक, संस्था समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, मुख्याध्यापिका एम. एम. सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--
06550
मधुरा पाटील, अनुष्का पंडित, नंदिनी धुरी

बांदा नाबर स्कूलचा निकाल १०० टक्के
बांदा ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल १०० टक्के लागला. एकूण ३९ सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतून मधुरा पाटील (९६.८०), अनुष्का पंडित (९५.६०), नंदिनी धुरी (९२.६०), गौरी नाईक (९२.४०), मुक्ता कामत (९१.४०) यांनी अनुक्रमे यश मिळविले. संस्थाध्यक्ष मंगेश कामत, प्रा. मनाली देसाई, पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा तनिशा सावंत आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.