रत्नागिरी-जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती
रत्नागिरी-जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

रत्नागिरी-जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

sakal_logo
By

M06651

जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

परिवहन विभागाचे फर्मान ; हजाराचा दंड, परवाना निलंबित होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटारसायकलचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्व दुचाकी चालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तींनां हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. त्याची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर १ हजार रुपये दंड करून ३ महिने परवाना निलंबित करण्यात येणार आहे, असे आदेश रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महामंडळे, महानगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना तसेच खासगी आस्थापना यांनी यांच्या आस्थपनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच कार्यालयात येणाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ कलम २५० नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर ५० सी.सी पेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तीस मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ च्या तरतुदीनुसार अपवाद करण्यात आलेला आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्ती विरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/१७७,२५०(१) नुसार तसेच कलम १९४(३) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून १ हजार दंड तसेच वाहनधारकाचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.