संजय राऊतांविरोधात मालवणात घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊतांविरोधात 
मालवणात घोषणाबाजी
संजय राऊतांविरोधात मालवणात घोषणाबाजी

संजय राऊतांविरोधात मालवणात घोषणाबाजी

sakal_logo
By

६८२१
फोटोसंक्षिप्त

संजय राऊतांविरोधात
मालवणात घोषणाबाजी
मालवण : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह कृती करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भरड नाका येथे जोडो मारो आंदोलन छेडले. या वेळी खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह कृती उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत आहेत. यात आज शहरातील भरड नाका येथे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्राला जोड्या मारण्यात आल्या. या वेळी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आंदोलनात तालुकाप्रमुख महेश राणे, अरुण तोडणकर, अच्युत लोके, उदय राऊत, नीतेश पेडणेकर, कमलेश सारंग, नीलम शिंदे, भारती घारकर, निकिता तोडणकर, बाळू नाटेकर, तात्या बांदेकर, भिवा कोळंबकर, नित्यानंद कांबळी, प्रसाद तोडणकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

६८२२

बॅडमिंटनपटू युसूफ शेखची
‘खेलो इंडिया’तर्फे निवड़
सावंतवाडी, ता. ३ ः वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजे दहावीत असतानाच बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर मजल मारणारा येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी युसूफ शेख याची ''खेलो इंडिया''तर्फे गोवा राज्यात निवड करण्यात आली. गोवा राज्याने त्याला दत्तक म्हणून स्वीकारले आहे. यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेत युसूफ याला ८६ टक्के गुण प्राप्त झाले. अभ्यास आणि खेळ या दोन्हींमध्ये योग्य सांगड घालत ते नावीन्यपूर्ण असे यश मिळविले आहे. येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये सेमी मराठी दहावीमध्ये तो शिकत होता. लहानपणापासूनच त्याला बॅडमिंटनची आवड असून प्रशिक्षक अनिरुद्ध व सुमोख चव्हाण या दोन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले. विशेष मार्गदर्शन अॅड. क्षितिज परब व हायस्कूलचे क्रीडाशिक्षक राजेंद्र मोरे, बॅडमिंटन खेळाडू बहीण सानिया शेख, वडील माजी सैनिक मैनउद्दीन शेख व आई या दोघांनी विशेष मेहनत घेतली. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव भालचंद्र सावंत यांचेही मार्गदर्शन लाभले.