
आमदार वैभव नाईकांतर्फे कुंभारमाठलाही पाणीपुरवठा
07006
मालवण ः आमदार वैभव नाईक यांनी कुंभारमाठ गावासही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.
आमदार वैभव नाईकांतर्फे
कुंभारमाठलाही पाणीपुरवठा
मालवण, ता. ४ : प्रशासनाकडून कार्यवाही होण्याची वाट न पाहता कोळंब गावापाठोपाठ कुंभारमाठ गावासही आमदार वैभव नाईक यांनी स्वखर्चाने पाणीपुरवठा केला. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.
तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यात कुंभारमाठ गावालाही पाणीटंचाईची समस्या असल्याने आमदार नाईक यांनी तातडीने टँकर उपलब्ध करून देत पाणीपुरवठा केला. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था होईपर्यंत आमदार नाईक यांनी कालपासून स्वखर्चाने तातडीने नागरिकांची पाण्याची समस्या टँकरद्वारे करत मार्गी लावली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने पाणी टंचाई भागात पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुंभारमाठ शाखाप्रमुख सदा करंगुटकर यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, सुवर्णा भोगावकर, तृप्ती लंगोटे, गुडेकर, संजय देऊलकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा उप शहरप्रमुख उमेश चव्हाण,अनिल भोगावकर, हेमंत मोंडकर, राजू साळगावकर, दादा पाटकर आदींसह कुंभारमाठवासीय उपस्थित होते.