मोरेश्वर संघाची ‘शूटिंग व्हॉलिबॉल’मध्ये बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरेश्वर संघाची ‘शूटिंग व्हॉलिबॉल’मध्ये बाजी
मोरेश्वर संघाची ‘शूटिंग व्हॉलिबॉल’मध्ये बाजी

मोरेश्वर संघाची ‘शूटिंग व्हॉलिबॉल’मध्ये बाजी

sakal_logo
By

07030
तांबळडेग ः येथील शुटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला गौरवण्यात आले.

मोरेश्वर संघाची ‘शूटिंग व्हॉलिबॉल’मध्ये बाजी

तांबळडेगमधील स्पर्धा; गांगेश्वर संघ ठरला उपविजेता

देवगड, ता. ४ ः तांबळडेग (ता.देवगड) येथील दिपमंदिर क्रीडा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत मोर्वे येथील मोरेश्वर संघ विजेता तर नारिंग्रे येथील गांगेश्वर संघ उपविजेता ठरला.
तांबळडेग येथे सोलर सिस्टिमच्या माध्यमातून तांबळडेग ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. याचे उद्‍घाटन श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष मधुकर धावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अंजिता कोचरेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. मोर्वे येथील मोरेश्वर संघ विजेता ठरला. प्रकाश मालाडकर यांच्या स्मरणार्थ प्रवीण मालडकर यांजकडून रोख पाच हजार आणि कायम चषक प्रदान करण्यात आला. नारिंग्रे येथील गांगेश्वर संघ उपविजेता ठरला. त्या संघाला काका मुणगेकर यांजकडून रोख तीन हजार आणि कायम चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक दिपमंदिर तांबळडेग संघाने मिळवला. गंधर्व जोशी यांजकडून रोख दोन हजार आणि कायम चषक देण्यात आला. चतुर्थ क्रमांक आचरा येथील शिव रामेश्वर संघाला मिळाला. त्यांना पांडुरंग (अण्णा) शिरवडकर यांजकडून रोख एक हजार रूपये आणि कायम चषक देण्यात आला. स्पर्धेतील उत्कृष्ट शूटर-प्रथमेश धुरत (मोर्वे), उत्कृष्ट लिफ्टर-नीलेश गांवकर (नारींग्रे), सर्विसमन-कंक्रादिक लोणे (मोर्वे) यांना गौरवण्यात आले. पंच म्हणून इसाक रखांगी, प्रमोद सनये, निलेश गांवकर यांनी तर गुणलेखक म्हणून बाळू धुरी, बाबुराव सनये यांनी काम पाहिले. गणपत राजम आणि आनंद राजम यांनी खेळाचे धावते समालोचन केले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला देवगड शूटिंग व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय कदम उपस्थित होते.