
जनतेशी जुळलेली नाळ कायम
07252
कणकवली ः शिवाजीनगर येथे स्वच्छता मोहीम आणि वीज खांबावरील झाड्यांच्या फाद्या तोडण्यात आल्या.
जनतेशी जुळलेली नाळ कायम
अबीद नाईक; प्रभागातील विकास कामे सुरूच
कणकवली,ता. ५ ः शहरातील शिवाजीनगर येथील जनतेने मला निवडून दिले. म्हणूनच येत्या पावसाळ्यात पूर्वी ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामागे जनतेची जुळलेली नाळ माझी कायम आहे, असे मत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अबिद नाईक यांनी आज येथे व्यक्त केले.
कणकवली नगरपंचायतीमध्ये सध्या प्रशासक आहे; मात्र, ज्या प्रभागातून आपण निवडून आलो. त्या प्रभागातील विकासकामे कायम सुरू राहतील, असा विश्वासही श्री. नाईक यांनी व्यक्त केला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या प्रभागातील स्वच्छतः मोहीम आणि वीज खांबावरील ट्री कटिंगचे काम स्वखर्चाने श्री. नाईक यांनी हाती घेतले होते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. यामागे या परिसरात असलेली झाडे ज्यामधून तारा गेल्या आहेत. यातून अनेक अडचणी निर्माण होतात. महावितरण कंपनीला ट्री कटिंगसाठी परवानगी मिळत नाही; मात्र, श्री.नाईक यांनी प्रत्येकाची समजूत घालून. आज शिवाजीनगर भागातील ट्री कटिंगचे काम पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासोबतळी राम आडेलकर, मिलिंद वालावलकर, नितीन नाईक, प्रा.दिवाकर मुरकर, महेंद्र मुरकर, नंदकिशोर गुरसाळे, सत्यविजय चिंदरकर, संजय कांबळी आदी उपस्थित होते. श्रमदानातून आणि स्वखर्चातून हा उपक्रम अबिद नाईक यांनी राबवला.