गगनगिरी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

गगनगिरी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

सोलगाव न्यू इंग्लिश स्कूलचा
दहावीचा निकाल शंभर टक्के
राजापूर ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या तालुक्यातील सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रणव बाणे (९०.४० टक्के), अनिकेत तेरवणकर (८८.२०) आणि श्रेया टेमकर (८७.२०) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकार्‍यांसह प्रशाळेचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले, शिक्षक प्रसाद गुरव, अरविंद जाधव, प्रसाद म्हाडदळकर, अजित गुरव यांच्यासह पालकांकडून अभिनंदन केले जात आहे.
---------------
साने गुरूजी विद्यामंदिरचा निकाल ९७.६१ टक्के
राजापूर ः तालुक्यातील जानशी येथील सानेगुरूजी विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के लागला असून, त्यामध्ये ओम जैतापकर (९३.४० टक्के), पार्थ कोठारकर (९०.४०) आणि आनंद गिरी (८८.६०) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकार्‍यांसह शिक्षकवृंद, पालक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे
---------------
गगनगिरी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
राजापूर ः तालुक्यातील तुळसवडे येथील श्री सद्गुरू गगनगिरी स्वामी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांच्यासह जांभवली येथील सोमेश्‍वर क्रीडा मंडळातर्फे अभिनंदन केले जात आहे.
----------------------
जिजामाता विद्यामंदिरमध्ये राणी शिंदे प्रथम
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये राणी शिंदे (८६.८० टक्के), दीप्ती नेवरेकर (८६.२०) आणि सानिका म्हेतर (८६) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत. या सर्व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्रशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com