कुडासेतील फाले कुटुंबीयांना मंत्री केसरकरांकडून मदत

कुडासेतील फाले कुटुंबीयांना
मंत्री केसरकरांकडून मदत

07302
कुडासे ः राकेश फाले यांना आर्थिक मदत सुपूर्द करताना गणेशप्रसाद गवस व शिवसेना कार्यकर्ते. (छायाचित्र ः संदेश देसाई)

कुडासेतील फाले कुटुंबीयांना
मंत्री केसरकरांकडून मदत

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ : कुडासे येथील शेतकरी राकेश फाले यांच्या शेळ्या विषबाधेने मृत्युमुखी पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याची तात्काळ दखल घेत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी ही मदत राकेश फाले यांच्याकडे सुपूर्द केली.
राकेश रामा फाले हे शेळीपालन व्यवसाय करतात. दुसऱ्याकडून बकरी विकत आणून ती वाढविणे व मोठी झाल्यावर ती विकणे, असा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायातूनच ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शेळ्या विकत आणल्या होत्या. या शेळ्यांना बुधवारी (ता. ३१) माळरानावर चरण्यासाठी सोडले होते. सायंकाळी चरून झाल्यानंतर त्या शेळ्या घरी आल्या; मात्र रात्री त्यातील काही शेळ्या गोठ्यात मृत झाल्या. यात फाले यांचे मोठे नुकसान झाले. शिक्षणमंत्री केसरकर यांनी तात्काळ याची दखल घेत फाले कुटुंबीयांना २५ हजारांची आर्थिक मदत केली. तालुकाप्रमुख गवस यांनी ही मदत फाले कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. तसेच सिंधुरत्न योजनेतून शेळीपालनासाठी प्राधान्याने फाले यांना मदत करण्याचे आश्वासन देत तशा सूचनाही केल्याचे गवस यांनी सांगितले. उपतालुकाप्रमुख दादा देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, मेघःशाम देसाई उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com