वाडीलिंबू आरोग्य केंद्रात हिवतापाबाबत जनजागृती

वाडीलिंबू आरोग्य केंद्रात हिवतापाबाबत जनजागृती

rat6p5.jpg-
07426
लांजाः वाडीलिंबू प्राथमिक आरोग्यकेंद्रात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव.
----------
वाडीलिंबू आरोग्य केंद्रात
हिवतापाबाबत जनजागृती
पावस, ता. ६ः लांजा तालुक्यातील खानवली ग्रामपंचायतीच्यावतीने हिवताप जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना जून साजरा केला जातो.
वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव यांनी हिवताप व इतर कीटकजन्य आजाराविषयी डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोग आदींची माहिती दिली. जनजागृतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही गुरव यांनी केले.
किटकांची उत्पत्तीस्थाने कोणती व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. फुलदाणीतील पाणी साठू देऊ नका, संडासच्या पाईपला जाळ्या बसवा, घरातील खिडक्यांना जाळ्या बसवा, रात्री झोपताना अंगभर कपडे वापरा, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा, एखाद्याला ताप आल्यास रक्त तपासणी करून घ्या आदींची माहिती देण्यात आली. हिवताप निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्त नमूना येऊन तो सूक्ष्मदर्शाखाली तपासणे आवश्यक असते व त्यानंतर कोणत्याही प्रकारचा ताप आहे हे ओळखून रुग्णाला औषधोपचार दिला जातो. कार्यक्रमाला सरपंच गणपत मांडवकर, वाघोजी खानविलकर, विनायक कालकर, सायली धावडे, अर्चना खानविलकर, विवेक बोरकर, अर्पिता मांडवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, डॉ. ईशा सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com