''इकिगाई'' तत्त्व उद्योजकतेतही मोलाचे

''इकिगाई'' तत्त्व उद्योजकतेतही मोलाचे

धरू कास उद्योजकतेची..............लोगो

फोटो ओळी
rat6p7.jpg
07429
प्रसाद जोग
---
‘इकिगाई’ तत्त्व उद्योजकतेतही मोलाचे

इंट्रो

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या दोन्ही परीक्षेत राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. याचा अर्थ कोकणातल्या मुलांमध्ये क्षमता आहेत. त्यांचीही काही स्वप्ने आहेत; पण खऱ्या अर्थाने आता गरज आहे ती आपल्या मुलांचा योग्य कल ओळखून त्यांना उद्योजकतेचे महत्व जाणून देण्याची. त्यांना फक्त त्यांच्या उपजीविकेचे शाश्वत साधन मिळावे म्हणून प्रयत्न करून भागणारे नाही तर आपल्या या हुशार युवावर्गाला त्यांच्या आयुष्याचे अचूक ध्येय किंवा जीवनउद्देश नेमके काय आहे ते समजावून सांगण्याची नितांत आवश्यकता आहे.
- प्रसाद जोग
----------

दीर्घायुषी आणि स्वस्थ व आनंदी जीवन जगण्याचा मूलाधार आपल्या या कोकणातच आहे. कोकणात राहूनही आपल्या क्षमता, आवड, कलाकौशल्ये जोपासत जर जागतिक पातळीवरील गरजांचा उद्योजकीय नजरेतून कानोसा घेता आला तर या कोकणातल्या लाल मातीत राहूनही आपल्या युवावर्गाचे जीवनमान समृद्ध होऊ शकते, हे आपल्या पुढील पिढीला उदाहरण देऊन आपल्या सर्वांना मोठ्या उत्साहाने व प्राधान्याने सांगावेच लागेल. जीवनाचा उद्देश किंवा जीवन जगण्याचे बळकट कारण शोधून उद्योगाची कास धरणारा युवावर्ग आपल्या कोकणात उदयास यावा म्हणून आपण आजच्या लेखात इकिगाई म्हणजे काय? व प्रत्येकाने आपली इकिगाई शोधण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. IKIGAI ही जापनिज फिलॉसॉफी असून, स्वतःला ओळखून आपल्या जीवनाचे नक्की प्रयोजन काय किंवा कोणत्या गोष्टींमुळे आपण एक व्यक्ती म्हणून समाधानी, आनंदी राहून आपल्या आवडीचे काम करण्यास न कंटाळता सहजवृत्तीने प्रवृत्त होतो किंवा प्रेरित होतो हे समजून जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी सतत स्वतःला आपल्या आवडीच्या क्षेत्रात उद्यमशील ठेवणं हा ज्यांचा प्राधान्यक्रम असू शकतो अशा सर्वांसाठी हे जापनीज तत्त्व अत्यंत महत्वाचे सिद्ध होऊ शकते व ते निवृत्तीनंतर क्रियाशील राहण्यापेक्षा करियरच्या सुरवातीलाच जर अंमलात आणले गेले तर आणखीन लाभप्रद ठरू शकते.
जपानी भाषेत Iki इकि म्हणजे जीवन आणि Gai म्हणजे मूल्य. आयुष्याच मूल्य जाणून आपल्या असण्याचे कारण शोधणे म्हणजेच रिझन फॉर बिईंग अर्थात् आपल्या असण्याचे योजन काय, हे लवकरात लवकर जाणून कार्यप्रवण होणे होय. इकिगाई (Ikigai) हे दीर्घ व आनंदी आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य किंवा तत्त्व आहे असे आपल्याला म्हणता येईल. कधीच निवृत्त न होता सतत उद्योगी राहून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करणे, हे यातून अपेक्षित आहे. इकिगाई ही एक जपानी कन्सेप्ट आहे, ज्याचा अर्थ आहे a reason for being म्हणजे आपल्या अस्तित्वाचे आपल्या जगण्याचे कारण काय ते बिनचूक शोधणे. प्रत्येक सकाळी उठल्यावर आपण आनंदी, समाधानी राहून आपल्या जीवन उद्देशाची पूर्तता करण्यात धन्यता मानणे किंवा त्यात उत्साह दाखवणे हे या सिद्धांतात अपेक्षित आहे. आपण कोणत्या प्रेरणेने किंवा कारणाने जागे होऊन कामाला लागतो हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असते. आपण जर सकारात्मक विचारांनी जागे होत असू तर आपल्याला आपले जीवनध्येय सहजसाध्य करता येऊ शकते. वन लाईफ वन मिशन या प्रणालीचा स्वीकार करायलाच आपल्याला ही IKIGAI शिकवत असते. काहीतरी भव्यदिव्य करण्याचे मनात घेऊन जर आपण जागे झालो तर आपण निश्चितच एक नवा इतिहास घडवू शकतो व चांगले निरामय आरोग्य जगू शकतो, यात शंका असण्याचे काही कारणच नाही .
आपण आपली स्वतःची इकिगाई शोधून काढायला हवी. यासाठी या लेखात एक आकृतीबंध दिलेला असून, तो आकृतीबंध वाचकांनी समजावून घ्यावा व आपली स्वतःची इकिगाई शोधून काढण्यासाठी स्वतःला कोणत्या गोष्टी चांगल्या जमतात व त्या न कंटाळता करायला आवडतात ते प्रामाणिकपणे लिहून काढावे व मग स्वतःच्या क्षमतांचा, आवडीचा अभ्यास करून तसेच कौशल्याचा अंदाज घेऊन कोणत्या कामात आपल्या स्वतःला गती आहे किंवा कोणती कामे कोणाच्यातरी सल्ल्याशिवाय सहजतेने करता येतात, याचा आढावा घ्यावा व त्याची नोंद ठेवावी. हे झाल्यानंतर मार्केट सर्व्हे करून किंवा अभ्यास करून जगाला कोणत्या गोष्टींची गरज किंवा आवश्यकता आहे याचाही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा व त्यानंतर जगाची गरज ओळखून त्यात कार्यप्रवण होण्याअगोदर कोणकोणत्या गोष्टींसाठी जग पैसे देण्यास तयार आहे हेही व्यवहार्य भूमिकेतून लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा व यातूनच आपल्याला आपली इकिगाई समजून घेण्यासाठी प्रेरित करावे. IKIGAI शोधून काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे मात्र गरजेचे आहे. कारण, यातच खऱ्या अर्थाने करिअरचे यश लपलेले आहे. प्रत्येक माणसाकडे स्वतःचे असे वेगळे असे कौशल्य व क्षमता असतेच असते; पण योग्यवेळी त्याची किंमत न कळल्यामुळे किंवा जे स्वतःकडे आहे तेच विसरून गेल्यामुळे सर्व काही स्वतःपाशी असूनही दुर्दैवाने फार मोठे यश संपादन करता येतेच असे नाही. कारण, मनुष्य स्वभावधर्मामुळे आकर्षण, प्रलोभने, स्पर्धा, ईर्ष्या, असूया या गोष्टी अडथळे ठरू शकतात व यातूनच ताणतणाव वाढीस लागून नको त्या चिंता निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शांतपणे आपली स्वतःची इकिगाई लवकरात लवकर शोधून काढणे हितावह होय. अर्थपूर्ण आनंदी निरामय व सुखी जीवन जगायचे का? स्पर्धात्मक, तणावपूर्ण व स्वतःला कायम व्यस्त ठेवणारे, धकाधकीचे जीवन जगायचे हे प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर, विचारधारेवर किंवा परिस्थितीवर अवलंबून असू शकते; पण सांप्रत परिस्थिती बदलायची असल्यास आपल्याला प्रथम आपली मानसिकता किंवा मनस्थिती बदलावी लागेल व याची सुरवात स्वतःपासूनच करावी लागेल. सुशेगात जगणं आठवून आपल्या निसर्गाला, आपल्या जल, जंगल, जमीन या संपत्तीला आपल्याला वाचवावं लागेल तरच येणाऱ्या काळात कोकणात कोकणी माणसाचे स्वतःचे पर्यावरणपूरक उद्योग नावारूपाला आल्याचे दिसून येईल.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com