
पदवी प्रवेश प्रक्रियेस कणकवलीत प्रारंभ
पदवी प्रवेश प्रक्रियेस
कणकवलीत प्रारंभ
कणकवली ः विविध शाखांमधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कणकवली कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखांसाठी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, अकाउंट अॅण्ड फायनान्स व पदवीसह स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २७ मेपासून सुरू झाली आहे. ही सुविधा महाविद्यालयामध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विनंती प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य आहे. त्याची अंतिम तारीख १२ जून आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--
एसटी कर्मचाऱ्यांचा
वेंगुर्ले येथे गौरव
वेंगुर्ले ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एसटी कामगार सेनेतर्फे ७५व्या वर्धापनानिमित्त येथील एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक कुंभार यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तर एसटी कर्मचाऱ्यांना मोफत पाणी बॉटल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, शहर समन्वयक विवेक आरोलकर, संदीप पेडणेकर, उमेश नाईक, हेमंत मलबारी, दिलीप राणे, गोपी गावडे, सुरेश उर्फ अण्णा वराडकर, संदीप केळजी, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.
-------------------
वेतोरे येथे उद्या
‘अखेरचा कौरव’
वेंगुर्ले ः वेतोरे येथील होशी मित्रमंडळातर्फे श्री देवी सातेरी मंदिरनजीक साई योगेश्वरी मंगल कार्यालय येथे गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सातला संयुक्त दशावतार मंडळाचा ‘अखेरचा कौरव’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या संयुक्त नाट्यप्रयोगात गणपती-रोहन शिरोडकर, रिद्धीसिद्धी-ज्ञानेश्वर परब, सुषर्मा-महेंद्र कुडव, भीम-नीलेश नाईक, नारद-पंढरीनाथ घाटकर, द्रौपदी-प्रशांत मेस्त्री, कृष्ण-गौरव शिर्के, च्यवन भार्गव-सुहास माळकर, तृणांकुरा-बंटी कांबळी, चर्मलासुर-उदय मोर्ये यांच्या भूमिका आहेत. संगीतसाथ हार्मोनियम-पपू घाडीगावकर, मृदुंग-चेतन मेस्त्री, तालरक्षक-आकाश खानोलकर करणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
...................
सावंतवाडीत रविवारी
निवृत्त सैनिकांची सभा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघाची मासिक सभा ११ जूनला सकाळी दहाला संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तातोबा गवस यांनी केले आहे.