दोडामार्ग रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

दोडामार्ग रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

07650
दोडामार्ग ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन केल्यानंतर प्रत्यक्षात कोनशीलाचे अनावरण करताना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस. सोबत डॉ. सुबोध इंगळे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे व अन्य. (छायाचित्र ः संदेश देसाई)

दोडामार्ग रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांचा आॅनलाईन सहभाग; मंत्री केसरकरांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ ः ‘शासन आपल्या दारी’, या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सावंतवाडी येथून दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला होता.
‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे, लघु, सुक्ष्म व मध्यम केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सावंतवाडी येथून जिल्ह्यातील विकास कामांची ऑनलाईन पध्दतीने भूमिपूजने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बांधकाम अभियंता अनामिका जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तसेच अन्य अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंतवाडी येथून जिल्ह्यातील विकास कामांची भूमिपूजने ऑनलाईन पध्दतीने केली. यात दोडामार्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाचे व साटेली भेडशी येथील क्रीडा संकुलनाचे ऑनलाईन भूमिपूजन केले. गेली काही वर्षे दोडामार्ग तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली होती. मात्र, रुग्णालयाचे काम रखडले होते. ग्रामीण रुग्णालय असूनही योग्य अशी वैदयकीय सुविधा नसल्याने रुग्णांना गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत होते. अधिक उपचारांसाठी जनतेला सावंतवाडी रुग्णालय किंवा गोवा येथील बांबोळी व म्हापसा येथील जिल्हा रुग्णालय येथे स्वखर्चाने जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी मागणी होती. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. त्यासाठी २२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे आज प्रत्यक्षात भूमिपुजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या काळात रुग्णालयाची इमारत उभी राहणार असून योग्य सुविधा मिळणार असल्याने तालुकावासीयांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी प्रमुख डॉ. सुबोध इंगळे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता संभाजी घंटे, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, नगरसेवक गौरी पार्सेकर, रामचंद्र मणेरीकर, क्रांती जाधव, स्वराली गवस, मणेरी सरपंच विशांत तळवडेकर, डॉ. रामदास रेडकर, डॉ. अक्षय रेड्डी, डॉ. शाहीन भुजवाळा, खानयाळे गावचे माजी सरपंच विनायक शेटये आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com