सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी 
अशोक खराडे यांचे निधन

सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक खराडे यांचे निधन

07657
अशोक खराडे

सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी
अशोक खराडे यांचे निधन
मालवण, ता. ६ : देवबाग येथील मूळ रहिवासी आणि निवृत्त अभिलेखाधिकारी अशोक कान्हू खराडे (वय ७४) यांचे चेंबुर-मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. राजभवन पुरालेखागार निर्मिती विभागाचे मुख्य संशोधकीय अधिकारी म्हणून खराडे यांनी सेवा बजावली. पुराभिलेख विभागातून अभिलेखाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले होते. २००९ मध्ये त्यांच्यावर राजभवन पुरालेखागाराची जबाबदारी सोपविण्यात आली. यात १९३४ ते २०१० या कालखंडातील ७७ वर्षांच्या अभिलेखामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल यांनी केलेल्या दुर्मिळ पत्रव्यवहारांचा समावेश आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतीय संघ राज्यांना प्रशासकीय घटनांचा गोषवारा, कथन केलेली हस्तलिखित पत्रे या अभिलेखागारामध्ये आहेत. २००४ मध्ये त्यांना मुंबईतील एका संस्थेमार्फत साने गुरुजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील भारतीय इतिहास संशोधक मंडळावर ते कार्यरत होते. अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com