कांदळवनात स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळवनात स्वच्छता अभियान
कांदळवनात स्वच्छता अभियान

कांदळवनात स्वच्छता अभियान

sakal_logo
By

२० ( पान २ साठी )

-rat८p१६.jpg-
२३M०८१३१
वेरळ ः पर्यावरणदिनानिमित्त एइआरएफ संस्थेतर्फे कांदळवनात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या प्रसंगी सहभागी ग्रामस्थ व संस्थेचे कार्यकर्ते.

एइआरएफ संस्थेतर्फे कांदळवनांमध्ये स्वच्छता

आंबवली, वेरळतर्फ वेश्वीत आयोजन ; कचऱ्याचा अडथळा

रत्नागिरी, ता. ९ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन (एइआरएफ संस्था) व सावित्री खाडी परिसरातील उमरोली गट ग्रामपंचायतीच्या आंबवली, वेरळ तर्फ वेश्वी या दोन गावांच्या जैविक विविधता समितीमार्फत कांदळवनांमधील कचऱ्याची सफाई केली.
गेली ३० वर्षे कोकणात प्रत्यक्ष जमिनीवर जंगल आणि जैवविविधता संरक्षणाचे काण एइआरएफ संस्था करत आहे. या दोन गावांलगत खाडी भागातील खाजण-तिवरांमध्ये (कांदळवन) मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, इतर कचरा साठलेला होता. त्यामुळे खाडीचे पाणी आणखी आत येते व इतरही आरोग्याचे प्रश्न तयार होतात. अशा कचऱ्यामुळे सागरी जीवनावर परिणाम होतात म्हणून हा कचरा मुळातच खाडीपरिसरात न येऊ देता त्याची विल्हेवाट कशी लावता येईल याबाबत संस्थेमार्फत जाणीव जागृती व जैविक विविधता समितीबरोबर गेले वर्षभर चर्चा सुरू होती. त्यातूनच या कार्यक्रमाची कल्पना पुढे आली. कांदळवन आणि त्यांचे महत्व विशद करून सांगणारे भित्तीपत्रकही संस्थेमार्फत प्रसारित करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत कांदळवन भागातील सर्व प्रकारचे प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, चप्पल इतर टाकाऊ तसेच अविघटनशील कचरा वेगळा केला गेला आणि ग्रामपंचायतींनी (आंबवली, वेरळ तर्फ वेश्वी) त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही गावांमध्ये या मोहिमेला भरपूर प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला जास्त संख्येने उपस्थित होत्या. सर्व ग्रामस्थांनी मिळून इथून पुढे गावातील कचऱ्याची गावातच विल्हेवाट लावावी, असे ठरवले. संस्थेने त्यांना यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या मोहिमेत भाग घेणाऱ्या सर्वांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी सदस्य दीपक बोरले, आजी सदस्य स्नेहा बोरले उपस्थित होत्या. एइआरएफमार्फत अक्षय गावडे, राज लिंगायत, शुभम पवार व महादेव सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एइआरएफ संस्थेला एलटी आय माईंड ट्री या संस्थेमार्फत मदत मिळाली. संस्थेचे महादेव सावंत यांनी आभार मानले.