खैरतोड प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खैरतोड प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खैरतोड प्रकरणातील संशयिताचा
अटकपूर्व जामीन फेटाळला
ओरोस, ता. ८ः डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड करून घटनास्थळावरून वनअधिकाऱ्यांना चकमा देऊन फरार झालेल्या संशयित आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर (वय - १९ वर्षे, रा.तळवडे) याने अटकपूर्व जामीनासाठी ओरोस येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.
त्याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर व त्याचे इतर दोन साथीदार यांना डेगवे येथील शासकीय जंगलात कटरच्या सहाय्याने तोड करून खैर वाहतूक करताना पकडण्यासाठी वन विभागाकडून सापळा लावण्यात आला. १८ मे रोजी या तिघांपैकी एक साथीदार महेश कुडव (वय-१८ वर्षे) रा. इन्सुलि याला रंगेहाथ पकडण्यात आले, तर सुदीन आगरवडेकर व त्याचा दुसरा साथीदार मंथन आईर (वय - १६ वर्षे), रा. वाफोलि हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले.
या दोन फरार आरोपींपैकी मंथन आईर हा आरोपी २४ मे रोजी स्वतःहून वन अधिकारी यांचे समक्ष तपासात सहकार्य करणेकामी हजर झाला परंतु दुसरा फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर हा फरार आहे. त्याने ओरोस सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्याची सुनावणी होऊन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फरार आरोपीवर ताशेरे ओढत त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला. या सुनावणी दरम्यान वन विभागाची बाजू तपासी अधिकारी तथा सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सरकारी वकील श्री. रूपेश देसाई यांनी प्रभाविपणे मांडली. तर संशयित आरोपीच्या वतीने सावंतवाडीचे वकील पंकज आपटे यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com