ratnagiri rain
ratnagiri rain

Ratnagiri Rain Update : ‘बिपरजॉय’चा प्रभाव; रत्नागिरीत पाच तालुक्यांत पावसाची हजेरी

वेगवान वाऱ्‍यासह समुद्र खवळलेला, प्रशासनाकडून सूचना
Published on

रत्नागिरी : बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे खेड, गुहागर, दापोली, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे, गावखडी, मिऱ्‍या, गणपतीपुळे येथे भरतीवेळी समुद्राच्या लाटा उसळत होत्या. वादळामुळे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही; मात्र जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे किनारी भागातील नागरिक सतर्क झाले होते.

जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी २ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. आज पहाटेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. वेगवाने वारेही वाहत होते. रत्नागिरी शहरासह परिसरातील गावांमध्ये पावसाची नोंद झाली.

ratnagiri rain
Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी

पंधरा ते वीस मिनिट पडलेल्या हलक्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. चक्रीवादळ पुढे सरकत उत्तरेकडे गेल्यामुळे मोठा परिणाम जाणवलेला नाही; परंतु दिवसभर किनारी भागात वारे वाहत होते. दापोलीत हर्णै, आंजर्ले परिसरात पहाटेला वारे वाहत होते. प्रशासनाच्या आवाहनामुळे खाडी किनारी छोट्या होडीने मासेमारी करणारेही समुद्रात गेले नाही. शुक्रवारी सायंकाळी गावखडी किनाऱ्‍यावरील सुरूची झाडे लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आहेत.

ratnagiri rain
Ratnagiri : 'तुम्ही मागासवर्गीय आहात, जाकादेवीत राहिलात तर रॉकेल टाकून पेटवून देऊ'; चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा

पावसाचे प्रमाण
तालुका - पाऊस (मि.मी.)

दापोली - २.००
खेड - ३.००
गुहागर - १२.००
रत्नागिरी - १.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com