वीजप्रश्नी देवबागवासीय पुन्हा आक्रमक

वीजप्रश्नी देवबागवासीय पुन्हा आक्रमक

09420
मालवण ः महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

09421
मालवण ः भाजप नेते देवदत्त सामंत यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा केली.

वीजप्रश्नी देवबागवासीय पुन्हा आक्रमक

सरपंचांसह ग्रामस्थांवर गुन्हे; मालवण पोलिस ठाण्यावर जमाव

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बाहेर काढत त्यांच्या अंगावर जात कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह १०७ जणांवर शासकीय कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले असून येथील पोलिस ठाण्यासमोर आज सकाळी मोठा जमाव निर्माण झाला होता. यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश साखरे यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, भाजपा नेते देवदत्त सामंत यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन ग्रामस्थ आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
देवबाग गावातील वीज वितरणामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच तांडेल यांच्या नेतृत्वाखाली काल (ता.१३) पुकारलेल्या आंदोलनात अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यानंतर याठिकाणी उपस्थित झालेल्या उपकार्यकारी अभियंता साखरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत ग्रामस्थ आणि महिलांनी त्यांना भर उन्हात थांबवत धारेवर धरले. या प्रकरणी श्री. साखरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देवबाग सरपंच उल्हास तांडेल, भालचंद्र उर्फ अवी विलास सामंत, विकास विलास ताम्हणकर, पंकज गणपत धुरी, मनोज मोरेश्वर खोबरेकर, सहदेव दुलाजी साळगावकर, राम चोपडेकर (सर्व रा. देवबाग), मिलिंद झाड (रा. वायरी भूतनाथ) या आठ जणांसह अन्य १०० महिला व पुरुषांवर गुन्हे दाखल केले आहेत. या आंदोलकांनी काल सकाळी ११ वाजता गैरकायदा जमाव करून गावातील विजेचा प्रश्न तात्काळ मिटवा, असे सांगून कार्यालयात प्रवेश करत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धाकधपटशाहीने कार्यालयाला कुलूप ठोकत कार्यालयीन कामकाज जबरदस्तीने बंद पाडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक विजय यादव करत आहेत.
---
दिवसभर तणावाचे वातावरण
देवबाग ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होताच, ग्रामस्थ आक्रमक बनले. सकाळीच मोठ्या संख्येने ग्रामस्थ पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, भाजपा नेते देवदत्त सामंत यांनी पोलीस ठाण्यात दाखल होऊन पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com