नवीन कुर्ली ग्रामपंचायतीसाठी पाठपुरावा
09431
अनंत पिळणकर
नवीन कुर्ली ग्रामपंचायतीसाठी पाठपुरावा
पिळणकर; विरोधकांच्या आयत्या पिठावर रेघोट्या
कणकवली,ता. १४ : नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, यासाठी १२ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.
त्याचेच फलित म्हणून आता स्वतंत्र ग्रामपंचायतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तसा अध्यादेश ग्रामविकास मंत्रालयाकडून निघेल; मात्र आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा बालिश प्रयत्न आमदार नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी करू नये, असा इशारा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.
नविन कुर्ली वसाहतीसाठी कादेशीर स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर होणार आहे. मात्र, याबाबात आमदार राणे यांनी मंत्र्याकडे लेखी मागणी केली आहे. यावर उत्तर देण्यासाठी श्री. पिळणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींच्या माध्यमातून स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी अथक प्रयत्न केले आहेत. मंत्रालयीन पातळीवरून अनेकदा मागे आलेल्या ग्रामपंचायत फाईल मधील त्रुटींच्या पूर्ततेसाठी अगदी तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती पासून ते जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागपर्यंत जाऊन परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर पाठवला. मागील १२ वर्षे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहे. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत पाटणकर, गोपाळ दुखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाही काढला. स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी हे नवीन कुर्ली वसाहतीमधील आबालवृद्धांचे स्वप्न आहे. त्यात राजकीय श्रेयवाद कोणीच आणू नये. दोन दिवसांपूर्वी माजी सभापती मनोज रावराणेंसह भाजप कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंची याबाबत भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या उपस्थितीत राणे समर्थक भाजप कार्यकर्ते याच विषयावर शिवसेनेत प्रवेश करतात. यावरून राज्यात सत्तेत भागीदार असलेले शिवसेना-भाजप पदाधिकारी नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत निर्मिती बाबत राजकीय श्रेयवाद घेण्यात गुंग असल्याचे दिसत आहे. १ मे २०२३ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. तेव्हा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडून शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नवीन कुर्ली वसाहतीसाठी पूर्वासित ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत प्रस्ताव पाठवल्याचे लेखी पत्र पाठवून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

