कुपेरी घाटीत एसटी कोसळली

कुपेरी घाटीत एसटी कोसळली

09441
मालवण ः कुपेरी घाटीत कोसळलेली एसटी.

कुपेरी घाटीत एसटी कोसळली

तांत्रिक बिघाड; प्रवाशी किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : येथील आगारातून पहाटे सुटलेली मालवण-बार्शी एसटी बस कुपेरीच्या घाटीत कोसळल्याची घटना आज सकाळी सहाच्या दरम्यान घडली. येथील तीव्र उताराच्या वळणावर चालत्या बसचे स्टेअरींग लॉक झाल्याने हा अपघात झाला. यात चालकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. रस्त्याच्या खाली १२ फुट कोसळून ही बस दोन वेळा गटांगळ्या खाऊन उभी राहिली. नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या भीषण अपघातानंतरही कुणाला मोठी दुखापत झाली नाही. बसचालक स्नेहलकुमार सांगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
याबाबतची माहिती अशी ः मालवण आगारातून पहाटे ४.५० ला सुटलेल्या मालवण-बार्शी (एमएच २० - बीएल २९५८) या बसमध्ये १८ प्रवाशी प्रवास करत होते. ही बस कुपेरीच्या घाटीत पोहचली असता तेथील तीव्र उताराच्या वळणावर चालत्या बसचे स्टेअरींग लॉक झाल्यामुळे ही बस रस्त्याच्या बाजुला कोसळत दोन वेळा पलटी होत उभी राहिली. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. वाहक श्री. देशमुख व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले. पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालक तसेच कुणकवळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मालवण आगाराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी चालक यांनीही अपघातस्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर किरकोळ जखमींनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातप्रकरणी प्रवासी मोतेस फर्नांडिस यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक श्री. सांगळे याच्या विरोधात वाहक व प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी श्री. मोरे अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com