जिल्ह्यात आजपासून शाळेचे नवे पर्व

जिल्ह्यात आजपासून शाळेचे नवे पर्व

जिल्ह्यात आजपासून शाळेचे नवे पर्व

८ हजार ६४२ विद्यार्थी; मोफत पाठ्यपुस्तकांचेही वितरण

ओरोस, ता. १४ ः शाळेच्या उद्याच्या (ता.१५) पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून शाळा प्रवेशोत्सव शाळा शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत उत्साहपूर्व व आनंददायी वातावरणात होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, ८ हजार ६४२ विद्यार्थी नव्याने शाळेत दाखल होणार आहेत.
शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाबरोबरच शाळा पूर्व तयारी पहिले पाऊल मेळावा क्रमांक २ चे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. शाळा शाळांमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरणासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मिळून ७५ लाख ८१ हजार रुपये एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. २५ हजार २७० विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे. मोफत पुस्तके वितरीत करण्यासाठी ५७ हजार ४६८ पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. निपुण भारत कार्यक्रमाची नियोजन पूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निपुण भारत अंतर्गत पायाभूत संख्याज्ञान व साक्षरतेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आलेले असून प्रत्येक विद्यार्थी निपुण करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी शाळा सज्ज आहेत. जिल्ह्यामध्ये १२८ शाळा शून्य शिक्षकी आहेत. त्याठिकाणी कामगिरीवर शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. शाळा बंद राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असे शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com