विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
२५ ( पान २ साठी)
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
निर्मला इलेव्हन संघ ; शिक्षक दाम्पत्याचा केला सत्कार
गुहागर, ता.१६ ः तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील निर्मला इलेव्हन संघाने बाबरवाडी व तांबडवाडीतील दोन जिल्हा परिषद शाळा व एका अंगणवाडीतील १०८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या उपक्रमामध्ये गावातील काही नागरिक आणि एका संस्थेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्यावेळी खेळाडूंनी तांबडवाडी शाळेतून बदली झालेल्या बुरटे दाम्पत्याचा सत्कार केला.
तवसाळ तांबडवाडीमधील निर्मला इलेव्हन संघाने जि. प. आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व जि. प. शाळा तवसाळ बाबरवाडीमधील अंगणवाडी (१८ मुले-मुली) १ली ते ७वी (५० मुले- मुली) तसेच दोन्ही वाड्यांमधील ८वी ते १४वीमध्ये शिकणाऱ्या ४० मुलेमुलींना प्रत्येकी १ डझन वह्या भेट दिल्या. याच कार्यक्रमात नरेश नाचरे, किरण धोपट, माजी सरपंच संदीप जोशी, विलास नाचरे यांनी दोन्ही शाळांमधील मुलांना कंपासपेटी, पेन्सिल बॉक्सची भेट दिली तसेच संतोष अबगुल प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांना १०० पॅड भेट म्हणून दिली.
तवसाळ तांबडवाडीमधील बुरटे व बुरटे यांची अन्य शाळेमध्ये बदली झाली आहे. निर्मला इलेव्हन संघातील अनेक खेळाडूंना बुरटे दाम्पत्याने शिकवले आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमामध्ये खेळाडूंनी बुरटे दाम्पत्याचा सत्कार केला. कार्यक्रमाला तांबडवाडी व बाबरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

