खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा उपचार

खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा उपचार

Published on

३३ ( पान ३ साठी)


-rat१५p३९.jpg ः
२३M०९६०२
खेड ः पालिकेच्या सभागृहात आयोजित आपत्ती निवारण नियोजन बैठकीत बोलताना प्रांताधिकारी राजश्री मोरे.

खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

अल्प उपस्थिती ; नालेसफाईबाबत नागरिकांची नाराजी

खेड, ता. १६ ः येथील पालिकेच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापनसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र ढिसाळ नियोजनामुळे अल्प उपस्थिती या बैठकीला लाभली. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडण्यात आली.

खेड पालिकेने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पालिकेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार साबळे, मुख्याधिकारी हर्षला राणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात झाली. या वेळी महावितरण, आरोग्य विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते तसेच डॉ. विक्रांत पाटील, साहिल बुटाला, निखिल चौधरी, सुयोग बेडेकर, आरिफ मुल्लाजी, यासिम मणियार, सरफराज पौत्रिक आदींसह नागरिक उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी प्रशासनाकडे शहरात नालेसफाई झाली नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
पालिका दरवर्षी केवळ आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीची औपचारिकता पार पाडत असून, प्रत्यक्ष काम होताना दिसत नसल्याचे देखील काही नागरिकांचे म्हणणे होते. या वेळी प्रांताधिकारी मोरे म्हणाल्या, रघुवीर घाटाबाबत लवकरच भेट देऊन घाटाची परिस्थिती पाहून बंदबाबत निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी भरती-ओहोटीच्या वेळा यावर लक्ष ठेवावं. नागरिकांना सूचना व माहितीदेखील देण्यात येईल. लाईफ जॅकेट आवश्यक असल्यास उपलब्ध केले जाईल. नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी दोन महिने महत्वाचे साहित्य दुसरीकडे नेऊन ठेवावे. नदीतील गाळ काढण्यास तांत्रिक अडचण आहे; परंतु सीआरझेडमुळे एका अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने अधिकारी त्याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे खेडच्या जगबुडी नदीतून गाळ काढण्याबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन परशुराम पाथरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com