निर्मल शौचालयावर कारवाईचा बडगा
३८ ( पान ३ साठी)
निर्मल शौचालयावर कारवाईचा बडगा
लांजा, ता. १६ः शहरातील निर्मल शौचालयातून बाहेर पडणाऱ्या मलमूत्रयुक्त सांडपाण्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून या निर्मल शौचालयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १९ जूनपर्यंत हे शौचालय बंद ठेवण्याच्या सूचना शौचालय चालकाला देण्यात आल्या आहेत.
लांजा शहरातील गजबजलेल्या आणि कायम लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी असलेल्या निर्मल शौचालयाची टाकी ही ओव्हरफ्लो होऊन टाकीतून बाहेर पडणारे मलमूत्र व दुर्गंधीयुक्त पाणी हे या परिसरात साचून राहिले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती आणि डासांचा उपद्रवदेखील वाढला होता. त्यामुळे हे निर्मल शौचालय, डास पैदास केंद्र बनले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत गुरूवारी (ता. १५) जूनला सकाळी लांजा नगरपंचायतीचे अधिकारी अविराज पाटील तसेच अधिकारी सोनाली खैरे, कर्मचारी विजय गुंडये, संजय गुरव यांनी या शौचालयाला भेट दिली व पाहणी केली. शौचालय चालकाला चांगले फैलावर घेतले. शौचालय चालकाला नोटीस देत कारवाईचा बडगा उगारला. आजपासून १९ जूनपर्यंत शौचालय बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

