मिऱ्या-नागपूर मार्गालगतच्या घरे, दुकान मालकांना नोटीस
४३ (पान ३ साठी)
मिऱ्या-नागपूर मार्गालगतच्या
घरे, दुकान मालकांना नोटीस
प्राधिकरणाची कारवाई ; अपघाताच्या धोक्यामुळे कार्यवाही
रत्नागिरी, ता. १६ ः मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिग्रहित जागेलगतच्या घरे, दुकानांची बांधकामे हटवण्याच्या नोटीस संबंधित मालकांना बजावल्या आहेत. ही बांधकामे अनधिकृत असून, महामार्ग सुरू झाल्यानंतर अपघाताची शक्यता असल्याची कारणे देऊन, अशी बांधकामे हटवण्यासाठी नोटीस दिल्या आहेत.
आता महामार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या नोटिसा बजावल्या आहेत. मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी ४५ मीटरपर्यंतच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या महामार्गावरील साळवी स्टॉप ते हातखंब्यापर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेली अनधिकृत बांधकामे प्राधिकरणाने हटवली होती; परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरवात न झाल्याने ती अनधिकृत बांधकामे पुन्हा उभी राहिली आहेत.
महामार्गाच्या जागेबाहेर अनेक घरे आणि दुकानांची बांधकामे झालेली आहेत. भविष्यात या बांधकामांमुळे अपघातांचा धोका असल्याने ही कोणतीही परवानगी न घेता केलेली बांधकामे काढून टाकण्याबाबत संबंधित मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या संदर्भात अनेक मालकांनी प्राधिकरणाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे. महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अपघातग्रस्त परिस्थिती निर्माण होत असेल तर आमची बांधकामे काढून टाकू, असे उत्तरात कळवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

