

09740
वेंगुर्ले ः ‘शासन आपल्या दारी’ पुस्तिका वाटपाचा प्रारंभ करताना सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर आदी.
नागरिकांपर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न
शिवसेना बैठकीत निर्णय; वेंगुर्लेत पुस्तिका वाटपाचा प्रारंभ
वेंगुर्ले, ता. १६ ः शिंदे-फडणवीस सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी शासनाच्यावतीने काढण्यात आलेली विविध शासकीय योजनांची पुस्तिका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचावी व या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्याबाबतचा निर्णय काल (ता. १५) वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. ‘शासन आपल्या दारी’ ही पुस्तिका वाटपाचा प्रारंभही यावेळी करण्यात आला.
तालुका शिवसेनेची मासिक सभा काल येथील सप्तसागर अपार्टमेंट येथील पक्ष कार्यालयात झाली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम, मच्छीमार सेल तालुकाप्रमुख गणपत केळुसकर, पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, पंचायत समिती माजी सदस्य समाधान बांदवलकर, शाखाप्रमुख शिवाजी पडवळ, विभाग संघटिका सावली आडारकर, दाभोली उपसरपंच फिनसुअनिता फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ, शिरोडा माजी ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, कृतिका कुर्ले, श्यामसुंदर कोळंबकर, दयानंद सावंत, सुधीर धुरी, संजय पाटलेकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब आदी उपस्थित होते.
यावेळी मुंबई- गोरेगाव येथे १९ जूनला होणाऱ्या शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जाण्याचे ठरविण्यात आले. नियमित कर्जदारांना मिळणाऱ्या ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानापासून अद्यापपर्यंत वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच खावटी कर्जाचा लाभ सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत ठरविण्यात आले. पर्यटनासंदर्भात महत्त्वाचे असलेले मोचेमाड येथील हॉटेल जुलै महिन्यात सुरू होत आहे. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. आरवली, उभादांडा, आसोली, पालकरवाडी, मठ व वेंगुर्ले शहर या ठिकाणी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून मोफत पाणीवाटप केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तालुक्यातील दहावी व बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अयोजित करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.