गाबीत जात पडताळणी गृह चौकशीद्वारे व्हावी
09744
मालवण ः गाबीत जातपडताळणी प्रश्नासंदर्भात समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांना निवेदन सादर केले.
गाबीत जात पडताळणी प्रश्न
गृह चौकशीद्वारे उपस्थित करा
मालवण, ता. १६ : गृह चौकशीद्वारे गाबीत जात पडताळणी प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा, अशी मागणी समाजबांधवांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांना काल (ता. १५) सादर करण्यात आले.
हिंदू-गाबीत समाजाचे वास्तव्य मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या किनारपट्टी भागासह सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी व्यवसायानिमित्त समाजातील काही लोक अन्यत्र स्थलांतरित आहे. ‘हिंदू-गाबीत’ समाजातील अनेक व्यक्तींना जात पडताळणीची तांत्रिक समस्या भेडसावते आहे. त्यांना १९६७ पूर्वीचा रक्ताच्या नात्यातील जातीचा पुरावा अनेक ठिकाणी शोधून सापडत नाही. अशा समाजबांधवांची जात पडताळणी प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण व्हावी, यासाठी गृह चौकशीचा पर्याय अवलंबण्याचा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मांडावा, अशी मागणी केली. तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळबंकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हरी खोबरेकर, महेंद्र पराडकर, बाबी जोगी, मिथुन मालंडकर, सदस्य भाई कासवकर, संतोष ढोके, नरेश हुले, भाऊ मोरजे, माजी नगरसेवक पंकज सादये, तोंडवळी माजी सरपंच संजय केळुसकर, सन्मेश परब, हेमंत मोंडकर, प्रशांत तोडणकर, प्रवीण मेस्त, निनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

