खासकीलवाडा पुलाची
साळगावकरांकडून पाहणी

खासकीलवाडा पुलाची साळगावकरांकडून पाहणी

Published on

09745
सावंतवाडी ः खासकीलवाडा भागात पाहणी करताना बबन साळगावकर.

खासकीलवाडा पुलाची
साळगावकरांकडून पाहणी
सावंतवाडी ः शहरातील खासकीलवाडा भागात पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. परिसरात पाणी साचू नये, यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना पालिकेचे बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर व मनोज राऊत यांना दिल्या. खासकीलवाडा येथे पुलाचे काम चुकीच्या पध्दतीने झाले असून त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या वाटेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचले आहे. याबाबतची तक्रार नागरिकांनी साळगावकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी आज पाहणी केली.
.............
09775
ऋषिकेश अधिकारी

मंगडेंची बदली, अधिकारींकडे पदभार
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची जिल्हा सायबर शाखेत बदली करण्यात आली आहे. दोडामार्गचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे सावंतवाडीचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बुधवारी (ता. १४) रात्री उशिरा काढण्यात आले. मेंगडे यांनी सावंतवाडी तालुक्यात गेले दहा महिने चांगल्या पद्धतीने काम केले. शहरात वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते; मात्र अचानक त्यांची बदली का झाली, याबाबत माहिती मिळाली नाही. जिल्ह्यात पोलिस ठाण्यांत गेले काही दिवस खुर्चीचा खेळ सुरू आहे. यापूर्वी सावंतवाडीत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा येथे कार्यभार देण्यात आला होता. पुन्हा या ठिकाणी मेंगडे यांना नियुक्ती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com