पिंगुळीत मनसेच्या वतीने
पिकअप शेडचे लोकार्पण

पिंगुळीत मनसेच्या वतीने पिकअप शेडचे लोकार्पण

Published on

09746
पिंगुळी ः येथे पिकअप शेडचे उद्‍घाटन करताना परशुराम उपरकर. शेजारी मनसे कार्यकर्ते.
(छायाचित्रे ः अजय सावंत)

पिंगुळीत मनसेच्यावतीने
पिकअप शेडचे लोकार्पण
कुडाळ, ता. १६ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कुडाळ मनसेकडून पिंगुळी येथे बस पिकअप शेडचे उद्धाटन करण्यात आले. तसेच नेरूरमध्ये महिलांना वृक्ष वाटप, हळदीचे नेरूर येथे सौर पथदिव्यांचे लोकार्पण आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
पिंगुळी येथील प्रसिद्ध वडगणेश मंदिर येथे राज ठाकरे यांना आगामी काळात उत्तुंग यश लाभो, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. वडगणेश मंदिरासमोर उन्हातान्हात उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्टॉप पिकअप शेडचे उद्घाटन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हळदीचे नेहरू येथे सौर पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. नेरुर गोंधयाळे येथील बचतगटाच्या महिलांना चाफा, आवळा, रक्तचंदन, कोकम, काजू, साग या वृक्षांचे वाटप करण्यात येऊन पर्यावरण संतुलनासाठी प्रबोधन करण्यात आले. पुढील तीन दिवस मनसेकडून तालुक्यात वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुका संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, दीपक गावडे, आपा मांजरेकर, अमोल जंगले, जगन्नाथ गावडे, वैभव धुरी, गजानन राऊळ, सागर सावंत, रामा सावंत, सत्यविजय कविटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com