शेट्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक
२१ (टुडे पान ३ साठी)
-rat१६p१०.jpg-
२३M०९७२५
रत्नागिरी ः बसणी येथे शेट्ये हायस्कूलच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.
-----------
विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक
बसणी ग्रामस्थ ; शेट्ये हायस्कूलचा निकाल १०० टक्के
रत्नागिरी, ता. १६ ः दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. गुणवंतांचा सत्कार बसणी शिक्षणसंस्थेच्यावतीने ग्रामस्थ व पालक यांच्या उपस्थितीत सत्कार केला. याचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यापूर्वीचा विक्रम मोडत मंथन वायगणकर याने ९३.४० टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळवला तसेच विशेष श्रेणीमध्ये तनया ठीक व साक्षी शिवलकर या अनुक्रमे दुसरी व तिसऱ्या क्रमाकावर चमकल्या.
विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेली शाळेची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कारप्राप्त सानिका पारकर हिने मनोगतामध्ये आपल्या यशामध्ये शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीने आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे प्राप्त झाल्याचे सांगितले.
मुकेश शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू दिल्या. आदर्श शिक्षक कदम गुरूजी, माजी संस्कृत शिक्षिका तारगावकर, माजी विद्यार्थी व केंद्रप्रमुख इंद्रनील नागवेकर यांनी रोख पारितोषिके दिली. मुंबईस्थित माजी विद्यार्थी विजय बंदरकर, अरविंद पावसकर यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी रोख रक्कम सुपूर्द केली. मिरवणुकीवेळी आरे, काळबादेवीतील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले. बसणी शिक्षणसंस्थेने केलेल्या सत्कार समारंभासाठी माजी विद्यार्थी उपेंद्र बापट व अॅड. राजशेखर मलुष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन सानिका पंडित यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

