रत्नागिरी-टुडे पान 1 साठी,संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी,संक्षिप्त

Published on

सिंधुरत्नतून २ कोटी ८३ लाख
निधीला प्रशासकीय मान्यता
रत्नागिरी ः सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी मंजूर ८ कोटी ८४ लाख रकमेपैकी रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त २ कोटी ८३ लाख ७१ हजार रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २ कोटी ७० लाख ६९ हजार रुपये निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात विविध यंत्रणांनी यात कामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सिंधुरत्न कार्यालयाची दुरुस्ती करणे यासाठी कार्यकारी अभियंता, उत्तर सा. बां. विभागाला १३ लाख २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे वाटप कार्यक्रम २२ लाख ८० हजार व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना मोफत नाचणी बियाणे वाटप २४ लाख ६१ हजार रु., मच्छीमार महिलांना ई-स्कूटरसह शीतपेटी पुरवठा करण्यासाठी ८ लाख ९५ हजार, मच्छीमारांना शीतवाहन पुरवणे यासाठी १ कोटी ५१ लाख ३३ हजार, आंबा वाहतुकीसाठी दोन कूलिंग व्हॅन उपलब्ध करणे ६३ लाख.


बाळासाहेब पाटणकरांना
स्मृती गौरव पुरस्कार जाहीर
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बाळासाहेब पाटणकर यांना पुणे येथील ज्ञान फाउंडेशन संस्थेच्यावतीने लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कुर्डुवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनाही पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्व. भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (ता. २४) जूनला सायं. ५.३० वा. पुणे येथील नवी पेठमधील कॉन्फरन्स हॉल एस. एम. जोशी फाउंडेशन येथे हा कार्यक्रम होणार आहे. माजी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून या वेळी आरोग्यसेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य आणि पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते आणि सचिव अर्चना मुंद्रा यांनी या भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


ई-केवायसी, बँक खाते
आधार संलग्नसाठी २०, २१ ला मोहीम
रत्नागिरी ः प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ हप्त्याचे लाभ वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी केंद्र शासनामार्फत ई-केवायसी आणि बँकखाते आधार संलग्न करणे बंधनकारक आहे. गावपातळीवर २० व २१ जूनला प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी क्षेत्रीय स्तरावर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ८ वा. आधारकार्ड व मोबाईल नंबर आधारकार्डला संलग्न केला आहे, तो मोबाईल नंबर घेऊन उपस्थित राहावे. जिल्हा लाभार्थी पीएम किसानसाठी ई-केवायसी वा बँकखाते आधार लिंक करणार नाही त्यांना १४ वा हप्ता मिळणार नाही. तसेच राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा फायदा उपलब्ध होणार नाही. सर्व लाभार्थ्यांनी गावपातळी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com