आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडणार

आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडणार

Published on

७ (टूडे पान १ साठी)

-- rat१६p१९.jpg-
२३M०९७३७
रत्नागिरी ः मेळाव्यात उपस्थित ठाकरे सेनेचे शिवसैनिक.
------------

आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडणार

कोतवडेत निर्धार मेळावा ; उद्धव ठाकरे शिवसेना आखाड्यात

रत्नागिरी, ता. १६ ः तालुका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी कोतवडे विभागाच्या प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी तालुक्यात विभागनिहाय बैठका होत असून कोतवडे विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोतवडे येथील घैसास सभागृहात झाला. या वेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजित कीर व संजय साळवी, उत्तम मोरे, दुर्गेश साळवी, प्रसाद सावंत, साईनाथ जाधव, रोहित साळवी, गजानन गिडये, स्वप्नील शिंदे आदींसह कोतवडे जिल्हा परिषद गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवावर्गाचा कल वाढत असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यात प्रमुख पदाधिकारी पुनसकर, बंड्या साळवी यांच्यासह उपस्थितांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देऊन आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. सर्वांनी एकसंघ होऊन काम करावे, असे आवाहनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com