चिपळूण - गणेशोत्सव काळात सिंगल लेनवरून वाहतूक धोक्याची

चिपळूण - गणेशोत्सव काळात सिंगल लेनवरून वाहतूक धोक्याची

Published on

फोटो ओळी
-rat16p5.JPG ः KOP23M09730 चिपळूण ः परशुराम घाटात सिंगल लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सिंगल लेनवरून वाहतूक गणेशोत्सवात धोक्याची
महामार्ग चौपदरीकरण ; अपघात होण्याचा धोका
चिपळूण, ता. 16 ः मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशोत्सवापर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले असले तरी गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र सिंगल लेनवरून वाहतूक सुरू झाल्यास अपघाताचा धोका कायम आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी दुपदरी होता. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे होते. तरीही या मार्गावरून चाकरमानी खासगी वाहने घेऊन अगदी जीव मुठीत धरून ये-जा करत होते; मात्र खड्ड्यांमुळे अपघाताचे विघ्न काही संपले नव्हते. महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर मागील 15 वर्ष हा त्रास कायम आहे. अॅड. ओवेस पेचकर यांनी रखडलेल्या कामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर कामाला गती मिळाली. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.
नुकतेच त्यांनी परशुराम घाटाची पाहणी केली; मात्र सिंगल लेनवर वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचा धोका जास्त आहे. कारण, मागील अपघाताचा विचार केला तर मुंबईत वाहन चालवण्याची सवय असलेल्या आणि कोकणातील वळणावळाचे रस्ते माहित नसलेल्या वाहनचालकांकडून अपघात व्हायचे. काही अपघात वाहनचालक साखरझोपेत असताना व्हायचे. सिंगल लेन सुरू केल्यानंतर एका लेनवरून वाहने ये-जा करणार आहेत. सिंगल लेन पूर्णपणे सिमेंट काँक्रिटचे असणार आहे. गणेशोत्सवात रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असणार आहे. खड्डेमुक्त रस्त्याचा आनंद घेताना वाहनचालक घरी लवकर पोहोचण्यासाठी वाहनांची गती वाढणार त्यामुळे एका लेनवरून दोन्ही बाजूची वाहने मार्ग काढताना अपघात होण्याचा धोका जास्त आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुंभार्ली घाटाची पाहणी करताना पावसाळ्यात हा घाट धोकादायक होण्याची शक्यता वर्तवली आहे. या घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या चिरणी-आंबडस मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

अपघात रोखण्याचे उपाय
सावर्डे, आरवली, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर मार्गावरील मार्गाची मंत्र्यांनी पाहणी केली. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. पात्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीतून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या ठिकाणी तसेच इन्सुली येथे पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. कणकवली वागदे फाटा हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी मोठे अपघात होतात. ते रोखण्यासाठी मोठे आरसे लावण्याची सूचना करण्यात आली आहे. कुडाळ येथील आरएसएन हॉटेलनजीक होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक बेट तयार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com