सावंतवाडी तालुक्यातील घाटांबाबत दक्षतेच्या सूचना
09754
सावंतवाडी : तहसीलदार श्रीधर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना पत्रकार बांधव.
सावंतवाडी तालुक्यातील
घाटांबाबत दक्षतेच्या सूचना
तहसीलदार पाटील; मॉन्सूनपूर्वीच दखल
सावंतवाडी, ता. १६ ः तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेची पाहणी केली आहे. पावसाळ्यात आंबोली, मळगाव, इन्सुली घाटरस्त्यांबाबत योग्य दक्षता व उपाययोजना संदर्भात नियोजन केले जाईल. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिन्याचा आढावा तसेच समस्या, अडचणींसंदर्भात पत्रकारांशी संवाद, चर्चासत्रही घेतले जाईल, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी तहसीलदारपदी पाटील यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आज तालुक्यातील पत्रकारांशी संवाद कार्यक्रम केला. या अगोदर त्यांनी माडखोल-धवडकी ते बांदा तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसा मोहिमेची पाहणी केली. नदीपात्रातील गाळ उपशासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तहसीलदार कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पाटील म्हणाले, "शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आता सावंतवाडी तालुक्यात प्रत्येक गावनिहाय महसूल विभागीय हा उपक्रम राबविणार आहोत. या अंतर्गत गावागावांतील लोकांच्या समस्या अडचणी, सोडवल्या जातील. त्यांना तहसीलदार कार्यालयात कुठल्याही दाखल्यासाठी अथवा माहितीसाठी यावे लागू नये, या दृष्टीने मंडल विभागीयनुसार शासन त्याचे नियोजन केले आहे. पीएम किसान योजनेसंदर्भात आता नव्याने अध्यादेश जारी झाला आहे. त्यानुसार आता ही योजना कृषी विभागाकडे नोंदणी करायची आहे. ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी कागदपत्रांसह आपली संपूर्ण माहिती द्यावी.’’
यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तालुक्यातील पत्रकार व अधिकारी यांच्यात योग्य सुसंवाद राहावा, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी पत्रकार संवाद चर्चासत्र ठेवण्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. येथील तहसीलदार कार्यालयात असा उपक्रम राबविण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तहसील कार्यालयात दर आठवड्याच्या रविवारी उपक्रम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अखिल मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, माजी तालुकाध्यक्ष विजय देसाई, राजेश मोंडकर, प्रवीण मांजरेकर, तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, उपाध्यक्ष दीपक गावकर, उमेश सावंत, अनिल भिसे, प्रेस क्लबचे अनंत जाधव, सोशल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, सचिन रेडकर, राजू तावडे, अरुण भिसे, जतीन भिसे, रुपेश हिराप, निखिल माळकर, सिद्धेश सावंत, नरेंद्र देशपांडे, राजाराम धुरी, प्रसन्न गोंदावले, शुभम धुरी, भुवन नाईक, नीतेश देसाई आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

