चालकाला डुलकी,
टेम्पो स्वीटमार्टमध्ये

चालकाला डुलकी, टेम्पो स्वीटमार्टमध्ये

Published on

चालकाला डुलकी,
टेम्पो स्वीटमार्टमध्ये
सावंतवाडी ः सातार्डा बाजारपेठेतील स्वीटमार्टमध्ये मंगळवारी (ता. १३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास आयशर टेम्पो घुसल्याने अपघात झाला. चिरे भरण्यासाठी गोव्यातून मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाचा डुलका लागल्याने ही दुर्घटना घडली. टेम्पोच्या जोरदार धडकेमुळे रस्त्याच्या बाजूचा वीजपोल जमीनदोस्त झाला. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने जीवितहानी टळली. महावितरणचे कर्मचारी निखिल गोवेकर, सर्वेश मांजरेकर यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला.
---------------
रेल्वेस्थानक रस्ता
दुरुस्तीची मागणी
कणकवली ः रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नरडवे रस्त्यापासून रेल्वेस्थानकापर्यंत जाणार्‍या जोडरस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड बनले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवासी व वाहन चालकांमधून होत आहे.
--------------------
शिक्षक पतपेढीतर्फे
२५ ला गुणगौरव
ओरोस ः सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी या संस्थेच्या २०२१-२२ मधील सभासद पाल्यांमधून दहावी परीक्षेत पहिल्या १० क्रमांकातील विद्यार्थी, बारावी परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या चारही शाखांमधील पहिल्या तीन क्रमांकातील विद्यार्थी, तर पाचवी व आठवी शिष्यवृत्ती धारकांमधून पहिल्या तीन क्रमांकातील तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेमध्ये पहिल्या तीन क्रमांकातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व संस्थेच्या रौप्य महोत्सवानंतरच्या संचालक मंडळातील संचालकांचा सत्कार प्रधान संस्थेच्या कार्यालयात सिंधुदुर्गनगरी येथे २५ जूनला सकाळी ११ वाजता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com