

२० (पान २ साठी)
धामणंदच्या विकासासाठी ५३ लाख मंजूर
चिपळूण, ता. १६ ः धामणंद (ता. खेड) गावातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी ५३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे धामणंद गावाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने माजी पर्यावरणमंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे गटातील गावभेट दौऱ्यादरम्यान धामणंद येथे देखील ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली. या वेळी गावाच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली होती.
यानुसार धामणंद गणपतीवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१० लाख रुपये), धामणंद जाधववाडी येथे मुख्य रस्ता ते गणपती विसर्जन घाट येथे पाखाडी बांधणे (५ लाख), धामणंद जाधववाडी ते राम मंदिर आढाव पाणी येथे पाखाडी बांधणे (५ लाख), धामणंद स्टॉप ते धामणंद गावठाण रस्ता खडीकरण करणे (१० लाख ), धामणंद गुढ्याचा आड दत्तमंदिर रस्ता डांबरीकरण करणे (४ लाख), धामणंद जाधववाडीअंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (४ लाख), धामणंद वगलाचा माळ राधाकृष्ण मंदिर ते श्रीपाद कदम यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख), धामणंद मुलांडावाडी रस्ता डांबरीकरण करणे (६ लाख), धामणंद मुलांडावाडी स्मशानशेड बांधणे (३ लाख) या विकासकामांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.