तवेराच्या भरधाव धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

तवेराच्या भरधाव धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Published on

२३ ( पान ३ साठी)

-rat१६p२८.jpg-
२३M०९८१३
साखरपा ः अपघातातील मोटार.
------------
अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

साखरपा, ता. १६ ः रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर कोंडगाव-शिंदेवाडी येथे दुचाकी आणि मोटारीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातात एक महिला जबर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार गणेश शेटकर हे दुचाकीने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात होते. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कोंडगावजवळ आले असता समोरून येणारी मोटार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार गणेश शेटकर हे जागीच ठार झाले, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुमित्रा गणेश शेटकर (वय ३७) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणि नंतर अधिक उपचारासाठी इतरत्र पुढे हलवण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावून आले. साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलिस नाईक वैभव कांबळे, तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com