गुहागर ः ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान
-rat१६p२९.jpg
09819
गुहागर ः जाळ्यात अडकलेले कासव
ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान
गुहागर, ता. १६ ः जागतिक सागरी कासव दिनाच्या दिवशीच जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाला कासवमित्रांनी सोडवून समुद्रात सोडले. हे कासव गुहागरच्या समुद्राच्या लाटांवर हिंदकळत होते. शुक्रवारी (ता. १६) सकाळी समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या सुहास शेटे व कासवमित्र संजय भोसले यांनी या कासवाला जाळ्यातून सोडवले व समुद्रात सोडून दिले. चारही पाय जाळ्यात गुरफटल्याने त्याला पोहता येत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात जाळे जाईल तिकडे जाण्याशिवाय कासवाला पर्याय नव्हता. अशा हतबल स्थितीत कासवाने अन्नाशिवाय किती प्रवास केला, ते माहिती नाही; मात्र जाळ्यातून सुटल्यानंतर त्याला नेहमीच्या गतीने पळता येत नव्हते, अशी माहिती कासवमीत्र संजय भोसले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

